माझ्या कंबरेचे स्नायू थंडीमध्ये खूप आकडून बसतात त्यामुळे कम्बर खूप दुखते यावर उपाय काय आहे
पुरुष - २८
डॉ. शिवकृष्ण (आयुर्वेद) :
थोडक्यात - नियमित योगासने,वजन आटोक्यात ठेवणे, वातप्रकोपामुळे होणाऱ्या कम्बरदुखीसाठी बस्ती उपचार व औषधे; आणि काही पथ्ये ह्यामुळे कम्बरदुखी नियंत्रणात येऊ शकते.
सविस्तर -
१. कंबरेचे स्नायू जास्त कामामुळे अथवा काहीच काम न केल्यामुळे अशक्त होतात.
२. वजन वाढणे आणि जास्त बैठे काम असे स्वरूप असेल तरी कंबर दुखू शकते. अशावेळी नियमित योगासने करणे फायदयाचे ठरते.
३. थंडीमध्ये जर कंबरेचे दुखणे वाढत असले तर हे वातप्रकोपामुळे होते आणि यासाठी बस्ती सारखा उत्तम उपचार नाही, योग्य बस्ती क्रम करून घेऊन आणि या नंतर सहचर तेल मात्रा बस्ती सुरू ठेवला असता आणि सोबत काही अंतर्गत घेण्यासाठी औषधे घेतल्यास तात्काळ फरक पडू शकतो. सोबत काही पथ्ये सुद्धा पाळावी लागतात जी व्यक्तिपरत्वे बदलतात.
४. सामान्यपणे वांगी, गवारी , कोरडे पदार्थ, हरभरा डाळ, तूर डाळ , शिळे पदार्थ , थंड पेय, थंड पाणी त्याचप्रमाणे जेवणापूर्वी जास्त पाणी घेणे टाळावे! ही काही सामान्य अपथ्ये आहेत.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment