वैद्यांना प्रश्न आहे, माझी मुलगी बाळंत झाली, तिला दुध आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे, रोज सकाळी तिला वेगवेगळ्या खिरी देतेय पण अजून काही उपाय असल्यास सुचवावे.
_____________________
डॉ. उषा झाडे (आयुर्वेद) : तुम्ही कशावरुन निष्कर्ष काढला दुध कमी आहे ते, कारण बाळ अंगावर प्यायल्यावर शांत झोपत असेल तर दुधाची कमतरता नाही,आणि डिलीवरी होउन किती दिवस झालेत, शक्यतो बाळाला दर १ तासाने अंगावर पाजावे, बाहेरील सप्लीमेंट्स देऊ नका, दुध वाढेल, तरीपण शतावरी पावडर २ चमचे कपभर दुधातुन द्या २ वेळा {शतावरी कल्प } डिलीवरी नॉर्मल आहे की सिझेरीयन कारण सिझेरीयन असेल तर काही पेशंटमधे वेळ लागतो दुध यायला, आणी जेवढ बाळाला सारख अंगावर पाजायला द्याल तेवढ दुध अधिक वाढेल तो एक भावनिक बॉंड असतो आई व बाळामधला.
डॉ. वृंदा कार्येकर (स्त्रीरोगतज्ज्ञ) :
➼ खसखस ,खारीक, हळीव बदाम खिरी द्या गूळ व दूध घालून बाजरीचा कोणताही पदार्थ द्या. मेथी, तोंडलीची भाजी, दलिया तिखट व गोड, जर मधुमेह नसेल तर सर्व असेल तर ताकात जिरे फोडणी घालून. खिरी द्या. द्रवरूप आहार मोजून ४लिटर हवा. प्रत्यक्षात पाणी प्यायलं जात नाही परिणामी दूध कमी येतं
➼ दुधात ९०%पाणी असतं ते प्रमाण ठीक ठेवायचं असेल तर पाणी योग्य प्रमाणात प्यायला हवे. ऊकळून गार केलेले पाणी वापरावे.
➼ बाळाला किमान ६/७वेळा शू झाली तर आई बरोबर पाजतेय.
➼ शतावरी कल्प २/२चमचे दुधातून २वेळा घेणे हा शेवटचा ऊपाय.
➼ दूध येण्यासाठी आईचं डोकं, मन शांत असावं लागतं.
मोबाईल, टीव्ही, संगणक गप्पा कुणाच्या देखत पाजणं टाळावं.
➼ सध्या आई बाळापेक्षा इतर गोष्टींना महत्व देते म्हणून दूध कमी येते.
➼ बाळाचं सगळं,आंघोळ मसाज, दुपटी बदलणं हे सर्व आईनेच करायला हवं आजीने नाही. पान्हा फुटण्यासाठी हे गरजेचं आहे.
➼ फरक पडल्यास जरूर कळवावे तेव्हाच उपचार पूर्ण होतील.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:
Post a Comment