प्रश्न - ७
वजन वाढत नाही सतत अशक्तपणा जाणवतो. मी विवाहित आहे दोन आपत्य आहेत.
पुरुष - ३०
डॉ. वृंदा कार्येकर व डॉ. शिवकृष्ण
नुसता अशक्तपणा आहे का वजन कमी होतयं? किती ? BMI काढा व योग्य वजन ठरवा.
https://www.calculator.net/bmi-calculator.html
वजन कमी होणे हे लक्षण आहे,ज्याची कारणे खालील पैकी असू शकतात..
वजन कमी होणे हे लक्षण आहे,ज्याची कारणे खालील पैकी असू शकतात..
१.सततच्या अशक्तपणाचे काही नेमके कारण समाजात नसेल तर अशा वेळी साधारण रक्तपरिक्षा करून हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासून घ्यावे. ते जर कमी होत असेल तर त्यावर योग्य तो उपचार सुरू करता येतो.
२. वजन ना वाढण्याला अनेक कारणे असतात जसे पोषक आहार कमतरता किंवा
३.प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्टाची कामे अथवा खाल्लेल्या अन्नाचे पचन ना होणे आणि त्यापासून तयार होणारा आहार रस प्राकृत नसणे. त्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही.
४. जास्त पित्ताचा त्रास असेल तर आतड्यांवर देखील सूज असू शकते ज्यामुळे पोषक तत्वे शरीरात शोषली जात नाहीत आणि अशक्तपणा आणि दुबळे पणा येतो.
५. कृमींचा त्रास असेल तर वजन वाढीवर परिणाम होतो.
६. मधुमेह व थायरॉईड व्याधी मध्ये वजनावर परिणाम होऊ शकतो.
अशा परिस्थितीमध्ये योग्य तो आयुर्वेदिक उपचार प्रकृती परीक्षण करून केल्यास आणि पंचकर्म पद्धतीची मदत घेतल्यास लवकर फायदा होतो.
प्रथम रक्त तपासणी ,ज्यामध्ये थायरॉईड व मधुमेह तपासणी करून संपर्क साधल्यास कारणमीमांसा करता येईल ..व सविस्तर लिहिता येईल.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
➵➵➵ संदेश पुढे पाठवत रहा ➵➵➵
No comments:
Post a Comment